पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

पिंपरी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवाशीयांना जनता कर्फ्यु च्या माध्यमातुन केलेल्या आवाहनाला पिंपरी चिंचवड शहरवाशीयांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर , पॅरामेडिकल स्टाफ , ॲम्बुलन्स  ड्रायव्हर , लॅबोरेटरी स्टाफ हाउसकीपिंग स्टाफ ,पोलीस कर्मचारी, बस  एअरक्राफ्ट स्टाफ ,आर्मी,   नर्सेस,वार्डबाय, आया मावशींना, अग्निशमन दल, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी व अधिकारी त्याचप्रमाणे कोरोना महामारी मध्ये लोकांना मदत करणाऱ्या … लोकांची सेवा करणाऱ्या सर्वांचे आभार.


कोरोना या संकटाचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज असुन अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. महापालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालय येथे १५ बेडचा व भोसरी रुग्णालयात १० बेडचे कोरोनाग्रस्तांसाठी आयसोलेशन आय.सी.यु.वार्ड तातडीने निर्माण करणेत येणार आहेत. त्याचबरोबर जिजामाता हॉस्पिटलची पाहणी केली असुन त्या ठिकाणी १०० आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील ७ खाजगी रुग्णालयांना आयसोलेशन आय.सी.यु.वार्ड तयार करण्याच्या सुचना देणेत आलेल्या आहे.


परदेशातुन आलेल्या ९१० नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या ज्या नागरिकांची शहरात रहाण्याची अथवा जेवणाची व्यवस्था नाही अशांसाठी आदिवासी विकास महामंडळाचे वसतिगृह, भोसरी या ठिकाणी २७५ बेडची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.  


होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तिंच्या बिल्डींग किंवा रहिवासाच्या आजुबाजुचा व सोसायट्यां परिसर निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. २४ मार्च पासुन औषध फवारणी करण्यात येणार आहे. यासाठी ४० पंप कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.  होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी महापालिकेच्या आदेशाचा भंग केल्यास त्यांचेवर तातडीने कारवाई करण्यातबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.  तसे आढळल्यास नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवरील ८८८८००६६६६ या क्रमांकाशी   किंवा ९९२२५०१४५० या व्हाट्सअप क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


सीएसआर च्या माध्यमातुन करण्यात आलेल्या आवाहनाला हिंदुस्थान लिव्हर कंपनी, भिवंडी यांचेकडुन प्रतिसाद मिळाला असुन १,०६,००० साबन आणि ६००० लिटर डोमेक्स डिसइन्फेक्टंट लिक्विड उपलब्ध होणार आहे.


याप्रसंगी पत्रकार परिषदेत माहिती देताना मा. नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेता व मा. संतोष (अण्णा) लोंढे सभापती स्थायी समिती उपस्थित होते