पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद


पुणे (दि. २४ मार्च ) –  करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू असताना रस्त्यावरील रहदारी सुरूच असल्याचं चित्र आहे. अनेक जण रस्त्यावर गाड्या घेऊन फिरत असल्याचं त्याचबरोबर पेट्रोल पंपवर गर्दी होत असल्याचं दिसून आल्यानं पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.


करोनाचा संसर्ग थांबवण्याच्या दृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल पंपावर होत असलेल्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले आहे


Popular posts
सुमित ग्रुपकडून ई -वाहनांची लक्ष्यवेधी बाजारपेठ उपलब्ध वाहन विक्रीवर दिला जाणार प्रोत्साहनपर भत्ता
हॉकी पॉलिग्रासचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हवा; उपमहापौर तुषार हिंगे यांची आग्रही भूमिका
‘जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहचवण्याचे नियोजन व्हावे’ डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणं ही सर्वांची जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
Image
सुमित ग्रुपकडून ई -वाहनांची लक्ष्यवेधी बाजारपेठ उपलब्ध वाहन विक्रीवर दिला जाणार प्रोत्साहनपर भत्ता